जल थल मल : निसर्ग आणि पर्यावरण प्रेमीच्या संग्रही असावेच असे पुस्तक!
मलामुळे होणारे पाण्याचे प्रदूषण, हा या पुस्तकाचा विषय आहे असे एखाद्याला वाटू शकते. पण तसे नसून जल, थल (जमीन मुख्यतः माती) आणि मल यांचा एकमेकांशी असणारा संबंध हा या पुस्तकाचा मूळ विषय आहे. लेखक या तीन तत्त्वांची सामाजिक अंगाने ऐतिहासिक आणि वैज्ञानिक चौकशी करत त्यांच्यातील संबंध प्रस्थापित करतो. लेखकाची विषयाबद्दल असलेली आस्था आणि तळमळ लेखनाला धार देते.......